भोर-मुंबई आझाद मैदानावर भाजपा- शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार ) या महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यांचा शपथविधी पार पडला.यावेळी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा अजित पवार यांचा शपथविधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंग ,नितीन गडकरी ,अशा 18 राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री , महायुती आणि भाजप मित्र पक्षांच्या नेते संत महंत विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थितांमध्ये पार पडला . नंतर राज्यात सर्वत्रच मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी भोर शहरांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे मिठाई वाटप करत मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी प्रदेश भाजपा सदस्य मारुतराव धोंडे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन मांडके, लीगल सेल जिल्हा सरचिटणीस ऍड.कपिल दुसंगे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पंकज खुर्द, जिल्हा मच्छीमार सेलचे अध्यक्ष सुरेश कांबळे, शिवसेना(शिंदे )शहर प्रमुख नितीन सोनावले, विशाल दुसंगे, दिपाली शेटे, स्वाती गांधी ,अमोल भाले ,नितीन चांदणे ,शब्बीरभाई शेख ,भरत देशमुख, कुमार पोळ, आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.