पुणेः ऐतिहासाहिक आणि शैक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात स्पाच्या द्वावारे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच पुणे पब आणि ड्रग्जचे केंद्र बनलेले असल्याचे दिसत असतानाच त्यात आता सेक्स रॅकेटची भर पडली आहे. कोंढवा, बाणेरनंतर आता विश्रांतवाडी भागात स्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला असून येथून दोन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणी स्पा मॅनेजर सुरज भरत शाहु वय ३० याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता पुणे पोलिसांचा कारवाईचा धडका
शहरात आधीच अवैध धंद्यांनी डोकं वर काढले असतानाच आता त्यात स्पाच्या द्वारे छुप्प्या पद्धतीने चालणारे सेक्स रॅकेटचे जाळे वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील अनेक भागात स्पाची केंद्र सुरू आहेत. या स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पुणे पोलीस सजग झाले असून संबंधित ठिकाणी स्पाच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायची खबर मिळताच बनावट ग्राहक म्हणून धाडी टाकून कारवाई करीत आहेत.
सेक्स रॅकेटमधून मोठी आर्थिक उलाढाल
पुण्यात वाढती पब संस्कृती, ड्रग्जचे जाळे, गुन्हेगारी यामुळे पुणे अगोदरच बदनाम होत आहे. त्यात अवैध धंदे आणि सेक्स रॅकेट यामुळेही पुण्याला ओळखले जाते आहे. त्यामुळे ही पाळेमुळे पोलिसांना उखडून टाकावी लागणार आहेत. त्यातही या अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ मिळत आहे, असाही प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. सेक्स रॅकेटमधून कोट्यवधींची उलाढाल महिन्याकाठी होत असल्याची माहिती आहे.