भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्यावतीने विशेष सन्मान
भोर – सन १९९२ पासून जगभरात सर्वत्र जागतिक दिव्यांग (अपंग) दिन ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो याचेच औचित्य साधून आज पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने भोर येथील पंचायत समिती सभागृहात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी भोर तालुक्यातून असंख्य दिव्यांग बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली . यावेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
दिव्यांग हे शरीराचे नसुन मनाचे असते उंच भरारी घेणाऱ्यांना कोणीही थांबवू शकत नाही, दिव्यांग बांधवांना सहानुभूतीची नाही तर आपुलकीने वागवण्याची गरज आहे, दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी तसेच या व्यक्तींना हक्काने आपल्या कल्याणाकारी योजनांचा फायदा होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे यावेळी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन शिंदे , सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव , विस्तार अधिकारी श्रीमती एस आर दंडे, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, रुग्णकल्याण समितीचे सदस्य विलास मादगुडे , प्रामुख्याने प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले ,उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे, महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड, सचिव शांताराम खाटपे, संपर्कप्रमुख भानुदास दुधाणे, राजकुमार मोरे बापू धोंडे राणी शिंदे मानसी मळेकर महेश मळेकर मोहन शेटे आदींसह तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांनी ही आपली मनोगते व्यक्त केलीत.