नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा येथे पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच 46 बीयू 1863) आणि कार (एमएच 09 जीयू 0334) यांच्यात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावर पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कार (एमएच 09 जीयू 0334) वरील चालकाने अचानक कार दुसऱ्या बाजूला घेतल्या कारणाने मागून येणाऱ्या कंटेनर चालकाने कार वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजूला घेतले परंतु त्यावरील नियंत्रण सुटले व कार ला मागून धडक देत कंटेनर चालक कंटेनर घेऊन थेट पुलाच्या मध्यभागी अडकला यामुळे पुणे सातारा मघामार्गवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातामुळे दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली असून कंटेनर देगाव फाट्यावरील पुलाच्या मध्यभागी अडकला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही, मात्र पुढील तपास पोलीस करत आहेत.