पुणेः राज्यात राजकीय तापमानाचा पारा चढत असला तरी पुणे शहरासह जिल्ह्यात थंडी वाढू लागल्याचे पाहिला मिळत आहे. गुलाबी थंडी सर्वत्र पसरल्याने रामप्रहरीच्या वेळेत अनेकजण गरमागरम चहा पिताना दिसत आहे. शहरासह जिल्ह्यातील थंडी गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर, जर्किन, टोपी आदी उबदार वस्तूंची खरेदी करण्यात येत आहे. ही थंडी अशीच काही दिवस राहावी, अशी भावना पुणेकर व्यक्त करताना दिसत आहेत.
दिवसभर थंडीची चाहूल जाणवत असली तरी रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणारे नागरिक उबदार वस्तू अंगावर परिधान करून कामाला जाताना दिसत आहे. काही ठिकाणी ऊन जरी दिसत असले तरी थंडी इतकी जास्त आहे, की त्यामुळे ऊनाचे अस्त्वित्व नाहीसे होत आहे. पुढील काही दिवसांत थंडी अजून वाढण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.