मुंबईः राज्यात महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्यानंतर आता १४ वी विधानसभा विसर्जित करण्यात आली असून, राज्यात नवे सरकार अस्तीत्वात येणार आहे. यापूर्वी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्त केला आहे. त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. यामुळे आता राज्यात सत्तास्थापनेला वेग आला आहे. राज्यात भाजप पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्याने भाजपच्या मुख्यमंत्री होईल, असे बोलले जात आहे. तब्बल भाजपच्या राज्यात १३२ जागा निवडून आल्याने भाजप मोठा भाऊ झाला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. नवे सरकार असत्वात येईपर्यंत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत.
- मुख्यमंत्री यांच्यासोबत २० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
- भाजप १०, शिंदेसेना ६ आणि राष्ट्रवादी अजित पवार ४ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ
- दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तेब
- गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून राज्यात येणार त्यानंतर नावाची अधिकृत घोषणा