पुणेः पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या एका झुडपात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृत्यदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज. दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपासला सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे वय अंदाजे ३५ वर्ष आहे. येथील परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरल्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला खून करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांना आहे. महिलेची हत्या कोणी व कशासाठी केली? हत्यमागेचे कारण याचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.