जेजुरीः पुरंदर विधानसभा निकालामध्ये पहिल्या १० फेऱ्यांमध्ये विजय शिवतारे यांनी आघाडी घेतली असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवतारे यांनी अजून काही फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली, तर संजय जगताप यांची डोकेदुखी वाढण्याचे शक्यता आहे. पुरंदर विधानसभेसाठी एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. त्यातल्या १० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे. या १० फेऱ्यांमध्ये शिवतारे सतत आघाडीवर जाताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय शिवतारे हे तब्बल १० फेरी अंती १५ हजार २०० मतांनी आघाडीवर आहेत.
आकडेवारी
- विजय शिवतारे ४४,६२४
- संजय जगताप २८,११७
- संभाजी झेंडे १५,०७४