भोरः उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणूक तर झाली आता अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. मात्र, राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मार्च महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे त्यादृष्टाने येथील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदावाराला लीड मिळवून देण्यासाठी इच्चुकांनी कंबर कसली होती. यामुळे आता तालुक्यातील आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी राजकीय गणितं आखाल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभवातून धडा घेतल्यानंतर अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत संघटन बांधणी केली. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक सदस्यांची परीक्षा घेतली आहे. पश्चिम भागात कोणत्या गट आणि गणातून किती व कशा पद्धतीने किती लीड मिळेल. यावर इच्छुकांची उमेदवारी ठरेल व त्यांची ताकद देखील दिसून येईल, असे सांगण्यात आले येत आहे.
निकालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल
भोर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रत्येक पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे भोरमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार आपल्या गटात लीड देण्यासाठी प्रयत्न केला आहे. यामुळे संधी कोणाला मिळणार हे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आधिक स्पष्टपणे सांगता येईल
.
इच्छुकांकडून दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न
स्थानिक स्वराज्य निवणुकीवरील प्रशासकीय राजवट हटवल्यानंतर अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होणार आहेत. भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनेही सर्व निवडणुका लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातून अनेकजण इच्छुक असून त्यांनी आपली दावेदारी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.