जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे
कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसाचे औचित्य साधत जेजुरी येथील जननी तिर्थ हजारो दिव्यांनी उजळून निघाले होते. हे दृश्य याचे देहि याची डोळा असे दिसत होते. या दिपोत्सवाजे आयोजन जयाद्री मित्र परिवाराने येथे केले होते.
जयाद्री महात्म्य या ग्रंथात” खंडोबा बाणाई विवाहानंतर क्रोधीत म्हाळसा येथे येऊन तप करू लागली. तेव्हा गंगा हि येथे आली. गणपती व नारद म्हाळसेचा शोध घेत या ठिकाणी पोहचल्यावर, म्हाळसा जलरूप होऊन गंगेत विलीन झाली. पण नारदांनी तिला ओळखले. गंगा व म्हाळसा दोघी गणपतीच्या माता म्हणून नारदांनी म्हाळसेने जेथे तप केले होते.
तेथे जननीची स्थापना केली व गंगेचे ठिकाणास जननी तीर्थ नाव दिले.” असे या ठिकाणाचे महात्म्य वर्णन केले आहे. हे मंदिर जानुबाई मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिरा शेजारीच जननी तिर्थ हि पुष्करणी आहे, पुष्करणीमध्ये शिवमंदिर आहे. ही पुष्करणी त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने हजारो दिव्यांनी उजळून निघाली होती. जयाद्री मित्र परिवाराच्यावतीने दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेस येथे दीपोत्सावाचे साजरा करण्यात येतो.