जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे
पुरंदरचे राष्ट्रीय रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे यांना बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या जनक बंगल्यावर रांगोळी करण्याकरिता बोलवले होते. ते खास त्यांचे रंगावली चित्र रेखाटने करीता आणि भोंगळे यांनी आपल्या हस्त कला कौशल्याने हुबेहुब बिग बी यांची प्रतिमा साकारली.
या रांगोळीचे अमिताभ बच्चन यांच्यासह खासदार जया बच्चन, मुलगी श्वेता यांनी कौतुक केले. तर ही रांगोळी साकारणारे भोंगळे यांना मिठाई देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. एवढी देखणी रांगोळी कशी काढली, असे आश्चर्यकारक उद्गार यावेळी अमिताभ बच्चन यांनी काढले. सदर वृत हे पुरंदर तालुक्यात पोहचताच सोमनाथ भोंगळे आणि त्यांच्या परिवाराचे कौतुक करण्यात आले.