वेल्हे (राजगड): पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्याच्या विंझर गावातील एका घरातून वेल्हे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना ३८ बॉक्समध्ये भरलेली देशी दारू सापडली.प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या असून, प्रत्येकी बाटली १८० मिलीच्या मापाची आहे. या दारूची एकूण बाजारमूल्य १ लाख २७ हजार ६८० रुपये आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दीपक दिनकर गायकवाड (वय ४३, रा. विंझर, ता. वेल्हे, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वेल्हे पोलीस ठाण्यात अजिंक्य शंकर बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.