कुंदन झांजले- राजगड न्युज
भोर: भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचे शुभहस्ते राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव, आरोग्यवर्धिनी स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया आरोग्य शिबिर मंगळवार (दि२६) तालुक्यातील एकूण सर्व प्रकारच्या २१०० रुग्णांची तपासणी करत पार पडले.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी करून मोतीबिंदू असलेल्या २७ रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी एच.व्ही.देसाई हॉस्पिटल हडपसर, पुणे येथे पाठविण्यात आले.
त्या ठिकाणी त्यांची विनामूल्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.