मनमानी कारभार व विचारात न घेता कार्यभार राजीनामा देणा-या सदस्यांची ग्वाही
भोर तालुक्यातील संगमनेर – माळवाडी (ता. भोर) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. भोर गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्याकडे देऊन ग्रामपंचायतीलाही पोस्टाने(दि.२०) राजीनामा पाठवले आहे.
भाटघर धरणा शेजारील संगमनेर – माळवाडी गावच्या सरपंच यांनी सदर सदस्यांना विचारात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत ९ सदस्यांपैकी आत्माराम आबुराव बांदल, अमोल प्रकाश शेलार, अनिल भगवान पवार, मनीषा कृष्णकांत नेवसे, शुभांगी अक्षय देशमुख या पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. संगमनेर – माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी माझ्याकडे पदाचे राजीनामा दिले आहेत. तसेच हे राजीनामा संगमनेर ग्रामपंचायतीकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांनी दिली. याबाबत विचारणा केली असता काही दिवसात होणाऱ्या बैठकीत संबंधित सदस्यांचे राजीनामे विषयी शहानिशा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली. पाच सदस्यांनी राजीनामे दिल्याने प्रशासन याकडे कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.