आजोबांचे स्वप्न केले साकार,आई वडिलांसह, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
भोर दि.२९ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या शालांत परिक्षेचा इयत्ता १० वी चा निकाल जाहीर झाला असून भोर तालुक्यात सर्वप्रथम येणाचा मान भोर भहरातील आर्या सच्चिदानंद दीक्षित हिने मिळविला आहे . सध्या तिच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत होतं असुन मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
भोर शहरातील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या आर्या हिने शालांत परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवत तालुक्यातून सर्वप्रथम येण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.आर्या हिचे वडील सच्चिदानंद (सचिन) दीक्षित हे अभियंता असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतात तर तिची आई ज्योती दीक्षित या शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्वर्गीय प्रल्हाद हरी दीक्षित यांची आर्या हि नात होय .आपल्या यशाचे सर्व श्रेय पालक, शाळेतील शिक्षक, मार्गदर्शक परमेश्वर कोठुळे यांना जात असून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचे आजोबांचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना आर्याने पास झाल्यावर व्यक्त केली.
भोर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नुकताच आर्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी तनिष्का व्यासपीठ प्रमुख सीमा तनपुरे , ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर , आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर , भोर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर सोंडकर , फायटर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष सुरज आवाळे ,ओम कोचिंग क्लासेसचे संचालक परमेश्वर कोठुळे यांनी आर्याचा गौरव करत शाल ,पुष्पगुच्छ , सन्मान चिन्ह, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत केला. यावेळी आर्या दीक्षितचे आई,वडील उपस्थित होते .