तासगांवः राज्यातील अनेक विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने रोहित आर. आर. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रोहित पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरुपात सभा पार पडली. या सभेतून या मतदार संघातील उमेदवार रोहित पाटील यांनी नागरिकांना येत्या २३ तारखेला विजयाचा गुलाल आणि भंडारा उधळण्याचे आवाहन केले.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजनावर बोलताना रोहित पाटील म्हणाले, ज्याने घड्याळ बनवलं त्याने त्या घड्याळाचे सेलच काढून टाकले आहे, त्यामुले त्या घडळ्याचा काहीच उपयोग नाही अशी खडमडीत टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. आबांच राजकारण हे सर्वसामन्यांच्या जोरावार होतं, माझं देखील राजकारण हे तसेच असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आबांचे विचार पोहचविण्यासाठी त्यांचा मावळा सज्ज असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले. यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रोहित पवार यांना मानणारा तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.