वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
पुसेसावळीत बालसभेत शकडो विद्यार्थी सहभागी
वाई : 2 ऑक्टोबर गांधी जयंतनिमित्त पुसेसावळी येथे ” हम सब एक है ” , ” हिंदू मुस्लिम सिख ईसाई है हम सब भाई भाई ” , ” रक्त हिरवं भगवं नसतं ते फक्त लाल असतं ” अशा घोषणांनी हुतात्मा बलभीम खटावकर स्मारक दणाणून गेले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन यांचे मुख्याध्यापक कोकाटे व मदने सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकामध्ये बाल सभेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. दोन्ही प्राथमिक शाळांच्या बाल मित्रांच्या सहभागाने छोटी फेरी काढण्यात आली व त्यानंतर हुतात्मा स्मारकात अभिवादन सोहळ्याला प्रारंभ झाला.
यावेळी विद्यार्थिनींनी बालसभेचा हेतू कथन केला व निवेदन केले की आपले बालसभेमध्ये महात्मा गांधींच्या चरित्राचे कथन गोष्टी रूप भाषणांनी मुलांनी करावे याप्रसंगी मुलांनी मोहनदास गांधी यांच्या बालपणीच्या गोष्टी कथन केल्या त्यानंतर विठ्ठल राऊत या शिक्षकांनी गांधीजींच्या जीवनाचे संघर्ष व त्याची कहाणी मुलांना सांगितली. त्यानंतर मुख्याध्यापक गौतम रामचंद्र कोकाटे यांनी 2 ऑक्टोबर 23 या महात्मा गांधींच्या जयंती सोहळ्याचे बाल सभेचे महत्त्व सांगितले. हुतात्म्यांचे गाव पुसेसावळी येथील नऊ हुतात्म्यांनी 9 सप्टेंबर 42 ला बलिदान दिले आहे त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून पुसेसावळीतील हुतात्मा स्मारक उभ्या आहे येथे आज बाल सभेमध्ये हुतात्म्यांना वंदन करण्यात येत आहे मोहनदास गांधी हे या बाल सभेतील मुलांप्रमाणे खोडकर हट्टी होते निरागस होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले त्यातून आपणाला स्वातंत्र्य मिळाले आहे हे आपण न विसरता विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन भाषण लेखन अभ्यास करून मोठे होणे हेच गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण उद्दिष्ट आहे असे सांगून त्यांनी प्रास्ताविक केले.
समितीचे कार्यकर्ते शिवाजी राऊत आपल्या बाल सभेतील विशेष व्याख्यानात म्हणाले की पुसेसावळी हे हुतात्म्यांचे गाव आहे हे शांतीचे गाव आहे हे सद्भावनेचे गाव आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे हे गाव आहे हे निर्माण करण्यासाठी बाल सभेतील प्रत्येक विद्यार्थी एक विद्यार्थी दहा घरांमध्ये जाऊन पुढील चार घोषणा वाचून दाखवेल आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल त्या घोषणा पुढील प्रमाणे शांतीचे गाव पुसेसावळी गाव सद्भावनेचे गाव पुसेसावळीचे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे गाव पुसेसावळीचे गाव एकात्मतेचे गाव पुसेसावळी गाव भाईचाराचे गाव पुसेसावळीचे गाव हुतात्म्यांचे गाव तसेच पुसेसावळी गाव महात्मा गांधींच्या विचाराचे गाव पुसेसावळी गाव धर्म समभावाचे गाव पुसेसावळी गाव या घोषणा कागदावर लिहून प्रत्येक विद्यार्थी नागरिकांना वाचून दाखवेल आणि त्यांच्या सह्या घेईल हा उपक्रम बालसभेमध्ये पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले व सर्वानुमते शांती प्रस्थापित करण्यासाठी ऐक्य तयार करण्यासाठी आवाहन व विनम्र प्रार्थना महात्मा गांधी समितीच्या वतीने शिवाजी राऊत यांनी संवाद साधताना शेवटी केले प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोनच्या सर्व शिक्षकांनी एकमताने हा उपक्रम राबवणार असल्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला.
सर्वात शेवटी ग्रामस्थ पालक विद्यार्थी या सर्वांचे बालसभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक मदने एम एस यांनी अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले