वाई प्रतिनिधी: सुशील कांबळे
वाई : शहरात गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. ओला सुखा कचरा उचलण्यासाठी अठरा लाख रुपयांचा ठेका डोळा गेला आहे. लाखो रुपयांच्या कमाईतुन ठेकेदार मालामाल झाला आहे. वाईकराचे आरोग्य मात्र धोक्यात आहेत् आधीच डेंग्यू ने डोकं वर काढलेले असताना उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत पालिका अधिकारी गप्प का ? यामागे अर्थकारण तर नाही ना? असा प्रश्न वाईकरांना पडला आहे.
माझी नगरसेवक प्रदीप जायगुडे यांनी याबाबत संताप व्यक्त केला असुन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानी म्हंटले आहे की, वाई नगरपरिषदच्या आरोग्य विभाच्या माध्यमयतून शहरातील घरोघरी जाऊन ओला सुखा कचरा घंटा गाडीतून गोळा करून वाई एम आय डीसी तील नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर त्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्या पासून खत निर्मिती केली जाते. वाईतील कचरा उचलण्याच्या ठेका एक विशिष्ट त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिला आहेअसुन त्या कामाचे दर महिन्याचे बिल १८००००० ₹(अठरा लाख रूपये) हे त्यासंबधीत ठेकेदाराला वाई नगरपरिषद देत आहे.
हा पैसे वाईकर नागरिकांच्या पाणीपट्टी, घरपट्टीतून जमा होत असतो मात्र त्याबदल्यात वाईकर नागरिकांना संपूर्ण वाई शहरात अगदी मध्यवर्ती ठिकाणी सुद्धा जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य दररोज पहावयास मिळते आहे आणि त्या आशा उघड्यावरील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे वाई शहरात सध्या साथीच्या आजाराने बहुसंख्य जनता आजारी पडली असून सर्वसामान्य नागरिक दवाखान्याच्या खर्चाने मेटाकुटीला आला आहे. हे वास्तव असताना वाईकर जनता मात्र यावर ब्रशब्द सुद्धा काढत नाही तसेच या विधारक गोष्टीचे मीडियालाही काहीसे देने घेणे नाही की काय हा पडलेला मोठा प्रश्न आहे? आशा प्रकारे वाईच्या स्वच्छते कडे कानाडोळा करून नगरपरिषद प्रशासन जनतेच्या , सरकारच्या पैशाची लूट करत आहे वाईकरांनो वेळीच जागे व्हा आणि आवाज उठवा असे आवाहन त्यानी केलें आहे.