वाई प्रतिनिधी: सुशील कांबळे राजगड न्युज
वाई : येथील जनता शिक्षण संचलित किसन वीर महाविद्यालयाचे एनसीसी युनिट आणि तालुका विधी समिती, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाई न्यायालय परिसरात शंभर एनसीसी कॅडेट्सनी कॅप्टन डॉ.समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता ही सेवा” उपक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने पार पडला.या उपक्रमाचे उदघाटन अतिरिक्त सत्र न्यायाधीश नंदिमठ आणि किसन वीर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील सावंत यांच्या उपस्थितीत होते.
दरम्यान,न्यायाधीश मा.तारू, न्यायाधीश मा.पाटो , वाई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.रमेश यादव, उपाध्यक्ष महेश शिंदे, ॲड. खडसरे, ॲड. गायकवाड, अधिक्षक किरण पोरे व पवार तसेच वाई न्यायालय येथील सर्वच स्टाफ यांनी संपूर्ण न्यायालय इमारत आणि परिसरात स्वच्छता केली.
या उपक्रमात 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, साताराचे हवालदार विश्वास सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.वाई नगरपालिकेने पाण्यासाठी अग्नीशामक बंब पुरविला. रोटरी क्लब, वाई व वाई वकील संघटनेने सर्व 100 विद्यार्थ्यांनी मास्क, हातमोजे आणि अल्पोपहार पुरविला.