वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई: यावर्षी कमी पाऊस कमी झाल्यामुळे भविष्यात शेती व पिण्यासाठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यासाठीच मा.जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी यांनी गावातील ओढ्यावरती वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते.त्यालाच प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या वतीने उडतरे येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये पडणारे पाणी हे जमिनीत जिरवून जमिनीतील पाणी साठा वाढविणे,तसेच शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संरक्षित पाणी उपलब्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी बोलताना तालुका कृषि अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांनी सांगितले की , वाई तालुक्यातील सर्व गावामध्ये जिथे योग्य जागा असेल तिथे कृषि विभाग,गावातील तरुण मंडळे यांनी सहकार्याने वनराई बंधारे बांधावेत आणि भविष्यातील पाण्याची सोय करावी.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, कृषि पर्यवेक्षक निखिल मोरे,कृषी सहाय्यकतानाजी यमगर,सरपंच अर्चना पवार,उपसरपंच मोहन पवार,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पवार, कृषि विभागाचे कर्मचारी व गावातील शेतकरी उपस्थित होते