एकसंघ रामोशी समाजाच्या वतीने सदस्याचा सन्मान
वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे
वाई : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गंगापुरी वाईतील न्यू गजानन मंडळाने साकारलेला उमाजी नाईक यांचा जीवनपट उलगडणारा जिवंत देखावा सर्वात लक्षवेधी डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. आपल्या शुर, पराक्रमी योद्धाचा इतिहास तरूण पिढीला उमगवा, प्रेरणादायी ठरवा यासाठी या मंडळाचे सभासद दरवर्षी देखाव्यांच्या माध्यमातून गौरवशाली इतिहास सादर करत असतात. उमाजी नाईक यांचा देखावा सादर केल्याबद्दल एकसंघ रामोशी समाज वाई यांच्यावतीने मंडळाच्या पदाधिकारी व सदस्याचा सत्कार केला.
न्यू गजानन मंडळाने दर वर्षीप्रमाणे या ही वर्षी दैदिप्यमान इतिहासच एक दुर्लक्षित पान उलघडण्याचा प्रयत्न केला या मध्ये मंडळाच्या जेष्ठ सभासद व कार्यकारिणी सभासदांनी राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर सजावट करण्याचे ठरविले व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून आपले योगदान देताना भव्य सेट्सची निर्मिती केली,उमाजींच्या जीवनावरील अनेक पुस्तके व नेट वर उपलब्ध असलेली माहिती गोळा करून त्याची स्क्रिप्ट/कथा तयार केली तसेच त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून आणि पार्श्व संगीत जोडून एक उत्तम ऑडिओ बनविला तो तितक्याच ताकदीने मंडळातीलच कलाकारांनी साकार करताना अभिनयाचे नवे आयाम दर्शविले ,
देखावा पाहत अक्षरशःअंगावर काटा उभा राहायचा, अशी एका पेक्षा एक थरारक दृश्य सादर करुन सर्वांची वाहवा मिळवली, याचा परिणाम वाई तालुका व परिसरातील प्रेक्षकांवर खूपच प्रभावशालीपणे जादू करून गेला बघता बघता तालुक्याची गोष्ट जिल्हा व नंतर महाराष्ट्रातील अनेक लोकांना प्रभावित करीत राहिली याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला शिवाय रामवंशी समाजातील अनेक संघटना व ग्रुप येऊन मंडळाचे मनोधैर्य वाढवत होत्या
मंगळवारी एकसंघ रामोशी समाज वाई तालुका यांच्या वतीने न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई यांचा भव्य सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, या गौरव सोहळ्यास आपल्या वाई तालुक्यातील मेणवली, भोगाव, पांडेवाडी ,अभेपुरी, बावधन ,बेलमाची , उडतारे , सुरूर, पाचवड , शिरगाव ,ओझर्डे, परखंदी, बोपर्डी अशा अनेक गावातून रामोशी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते…