सुशील कांबळे | राजगड न्युज
वाई : येथील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यासोबत सभासदांना विविध गंभीर आजारांना आर्थिक मदत देणारी मोफत आरोग्य विमा योजना सुरु करीत असल्याचे जाहीर करुन सभासदांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करतानाच येत्या पाच वर्षात सभासदांना अभिमान वाटेल असेच काम करु, अशी ग्वाही अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे यांनी दिली.
उत्कर्ष नागरी सह. पतसंस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारणभेत कोल्हापुरे बोलत होत्या. निवडणुकीनंतर होत असलेल्या या पहिल्याच सभेला प्रचंड पावसात सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभासदांच्या या अलोट प्रेम आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन अनुराधा कोल्हापुरे म्हणाल्या, संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे. संस्थेचा स्वनिधी एवढा आहे, की आपल्या संस्थेच्या ठेवीदारांना कधीच कोणती चिंता करण्याची गरज नाही. संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरा करण्याचा मानस संस्थापक कै.आनंदराव कोल्हापुरे यांचा होता. त्यांच्या विचारांवर वाटचाल करताना सभासद हिताचे अनेक उपक्रम राबवून त्यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल. सभासदांना १५ टक्के लाभांश देणे हे आमचे कर्तव्य असून ते कर्तव्य आम्ही पार पाडले आहे. त्याचसोबत या पुढील काळात हृदयरोगापासून कर्करोगापर्यंत आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रीयेपासून दातांच्या शस्त्रक्रीयेपर्यंत विविध शस्त्रक्रीया व उपचारांसाठी सभासदांना संस्थेतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे.यासह विविध योजना त्वरीत सुरु करीत असून ही आरोग्य योजना म्हणजे सभासद कल्याणाचे एक प्रकारचे विमा कवच आहे. दरम्यान, दोन लोकांनी आरोप केले म्हणून
सभासदांनी त्याला भीक न घालता संस्थेवर विश्वास दाखवल्याबद्दल कोल्हापुरे यांनी सभासदांचे आभार मानून यापुढील काळातही संस्था यापेक्षा अधिक वेगाने प्रगतीपथावर धावेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश पवार यांनी समाधानकारक उत्तरे दिली. संस्थेची बदनामी करुन संस्थेबद्दल विष पेरणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली