सासवड (बापू मुळीक) : कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते. परीक्षा देताना यश अथवा अपयश येणे ही बाब घडत राहते. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळेच मुलं घडत राहतात. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात पदार्पण केले तरी त्यांना यश मिळते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे.असे विचार महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.
राज्य लोकसेवा आयोग व इतर क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गेली ३७ वर्षे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान , पुरंदरच्या वतीने सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्ताने यावर्षी पोलीस उपनिरीक्षक – रेवती भोसले, सुधा भोसले, जनक जावरे, अजिंक्य जौंजाळ, शरद नवले,निखील राणे, अतुल कोलते, राजश्री चौरे . सनदी लेखापाल – रेखा गायकवाड , अनुजा जैन, प्रतिक मारणे, तन्मय कदम . स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – प्रतिक कोलते, अश्विनी राठोड, कोमल मेमाणे . कर निर्धारण अधिकारी – सायली ढुमे , सागर जाधव , कृषी मंडल अधिकारी मानसी पवार , कृषी अधिकारी- ज्योती वायकर ,बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी कल्याणी जगताप यांचा सन्मान करण्यात आला.
सत्कार प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना आम्ही कुठल्या समाजाचे आहोत. याचा विचार न करता आमच्या बुद्धिमत्तेमुळे आम्ही या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. भविष्यामध्ये या देशाचे नागरिक म्हणून गोरगरीब समाजासाठी उत्तम काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असे विचार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वतीने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झालेल्या अश्विनी राठोड यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव शिवाजी घोगरे, गौरव कोलते, कलाताई फडतरे, दिलीप निरगुडे, कुंडलिक मेमाणे, केशव काकडे, विकास कोलते, संतोष कोलते , अशपाक बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक यांनी केले. सूत्रसंचालन चौरंगनाथ कामथे यांनी तर आभार प्रतिष्ठानचे सहसचिव बंडूकाका जगताप यांनी मानले.