शिरवळः भाग २
गेल्या काही दिवसांमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या आवरात मुलींना छेडछाड करण्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. परिसरातील हुल्लडबाज, रोडरोमिओंकडून मुलींना त्रास दिला जात असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. आता या प्रकरणी शिरवळ पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून, जर कोणी मुलींसोबत असे काही गैरवर्तन केले तर त्याला पोलीसी खाक्या दाखविला जाईल, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे. तसेच संबंधिताला कायदेशीर कारवाई देखील सामोरे जावे लागले असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालायाच्या आवारात किंवा इतर ठिकाणी हुल्लडबाजांकडून मुलींची छेड काढली जात असल्याची माहिती शिरवळ पोलिांसाना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने पावले उचलायला सुरूवात केली आहे. राजगड न्यूजने या विषयी वार्तांकन देखील केलेले होते.
शाळेच्या आवारात पोलिसांच्या वतीने एक सुरक्षा कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच शिरवळ भागात अनेक ठिकाणच्या महाविद्यालय व शाळांवर पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेऊन आहे. मुलींसोबत काही छेडछाडीचे प्रसंग होत असेल किंवा कोणाी विनाकारक मुलींना त्रास देत असेल, तर मुलींनी न डगमगता निर्भया पथक किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. याबद्दलची मागील दोन महिन्यांमध्ये अंदाजे ६ प्रकरणे समोर आली होती. तसेच दहावीत शिकणाऱ्या मुलीचा देखील विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली होती. खरं तर शिरवळ व खंडाळ्या या भागामध्ये अनेक महाविद्यालय आणि शाळा आहेत. येथे शिक्षण घेण्यासाठी वाड्या वस्त्यांवर मुली येतात. पण मुलींची विनाकारण छेड काढणे, त्यांना त्रास देणे अशा अनेक घटना घडल्यामुळे शिरवळ पोलिसांनी यावर अटकाव घालण्यासाठी कडक पावले उचलेली आ्हेत. जर असे काही प्रकरण समोर आल्यास संबधितावर कोणत्याही प्रकारची हयगय दाखविण्यात येणार नाही, उलट त्याच्या विरोध कठोर पावले उचलली जातील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांचे राऊंडअप देखील या भागात वाढले असून, हुल्लडबाजी आणि रोडरोमिंओ तरुणांवर लगाम लावण्यासाठी अनेक उपाययोजना शिरवळ पोलिसांकडून आखण्यात येत आहेत. निर्भया पथके देखील तयार करण्यात आले असून, त्यांच्याकडून अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये राऊंडअप होत आहेत. आता यापुढे अशा प्रकारचे गैरकृत्य करताना अनेकजण धास्तावतील…
कोणत्याही मुलीली किंवा महिलांना अशा हुल्लडबाजांकडून काही त्रास होत असेल, तर त्यांनी थेट शिरवळ पोलिसांशी किंवा डायल ११२ वर संपर्क करुन माहिती द्यावी, संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा गैैरवर्तवन करणाऱ्यांना पोलीसी खाक्या दाखविण्यात येईल.
-संदीप जगताप, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस स्टेशन