दत्तात्रय कोंडे|राजगड न्युज लाईव्ह
शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
खेड शिवापूर ता. ३०: आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. बेमुदत आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांनी मंगळवार दी. ३० रोजी पुणे सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाटा येथे एकत्र येऊन लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांनी जरांगे यांना पाठिंबा दर्शवत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी आपल्या मनोगतात मांडले दहा टक्के मार्क कमी पडले की नोकरी नाही, गुन्हा काय? तर मराठा, सरकारी नोकरी नाही, गुन्हा काय? तर मराठा, मार्क जास्त असूनही एखाद्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर लाखो रुपयांचे डोनेशन भरल्याशिवाय मिळत नाही, का?
“एक मराठा लाख मराठा” “तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय” “हर हर महादेव” “जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा एक ना अनेक घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. येत्या काही दिवसांत आरक्षण मिळाले नाही तर शिवगंगा खोऱ्यातील वातावरण चिघळेल असा धमकीवजा इशारा यावेळी देण्यात आला.
भजन, कीर्तन , प्रवचनाचे यावेळी गायन करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढारी, लोकप्रतनिधी, आमदार, खासदार यांना गावात बंदी घालण्यात आली असून प्रत्येक ग्रामपंचायत ने तसे पत्रक जिल्हाधिकारी यांना मंगळवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जरांगे पाटील यांचा पुढील आदेश आल्यानंतर उपोषणाची दिशा ठरविली जाईल असे उपोषण करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.