राजगड वृत्तसेवा
खंडाळा : शिरवळ ता.खंडाळा येथील पोलीस स्टेशन मधील एक प्रकार समोर आला असून तेथील अधिकारी सामान्य व्यक्तीला आणि पत्रकाराना देखील आरोपी सारखी वागणूक देतो आणि तोच अधिकारी एखादा लोक प्रतिनिधी आला तर त्याला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे देखील करत असून सामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी व पत्रकाराने आपली पत्रकारिता करण्यासठी पोलीस स्टेशन आवारात जायचे कि नाही असा प्रश्न या वागणुकीवरून उपस्थित होत आहे.
शिरवळ येथील औद्योगीकरण वाढले त्याच प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हेगारी देखील वाढली आणि लोक प्रतिनिधी देखील वाढतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून सामान्य नागरिक पोलीस स्टेशनाची पायरी चढत असतोच आणि आपल्या व्यथा मांडत असतो . त्याच पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी हेच आपले घर आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करण्याचा वसा गेतालेले परंतु त्या पोलीस स्टेशन मधील त्या एका अधिकाऱ्याच्या वागण्याने सामान्य माणसाच्या मनात तर भीतीच बसली आहे. न्याय मागायला गेलेल्या व्यक्तीला आरोपी सारखी वागणूक दिली जाते आणि आरोपी असलेल्या व्यक्तीला मात्र व्हीआयपी वागणूक दिली जाते त्यामुळे नागरिकांमध्ये या अधिकाऱ्या बाबत भीती तर आहेच परंतु त्याच बरोबर गुन्हेगाराना पाठीशी घालणारा अधिकारी म्हणून नागरिकांत चर्चा देखील सुरु आहे.
कोणा एका वार्ताहराला हाताशी धरून इतर वार्ताहाराना आरोपी सारखी वागणूक देणे तर नविनच आहे. त्यांच्या चांगल्या कामाच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या वार्ताहराला तू पत्रकार आहेस का? आयडी दाखव ,बाहेर निघ अशा प्रकारची देखील वागणूक मिळत आहे. या वागणुकीवर वरिष्ठ अधिकाऱ्याना कल्पना दिली असता कामाचा येणाऱ्या ताणामुळे असे होत आहे असे उत्तर देऊन मोकळे मात्र झाले म्हणजे कामाचा येणारा तणाव हा सामान्य माणसावर काढायचा का? यावर विचार करण्यासारखी गोष्ठ आहे.
या अधिकार्याचे अवैध धंदे व गुन्हेगाराना पाठीशी घालण्याचे काम मात्र चांगल्या प्रकारे होत असून याच्या सोबत आर्थिक हितसंबंध असल्याच्या? चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात जनमानसात सुरु आहेत. परंतु त्या अधिकाऱ्याचा सामान्य व्यक्तीला मोठ्या प्रमाणात त्रास होत असून वरिष्ठ अधिकार्यांनी यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेणे अपेक्षितच आहे.
क्रम