भोर: भोर येथील राणी लक्ष्मीबाई ब्रीज काही दिवस बंद होता.बंद पुलाचे काम काही दिवसा पूर्वी पूर्ण करत तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला परंतु एकच दिवसात त्या रस्त्यावर खड्डा पडल्याची घटना घडल्याने रस्त्याच्या कामाची निकृष्टता समोर आली असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भोर शहरात वाहतुकीसाठी खुले झालेला जुन्या पुलावरील नवीन रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. राणी लक्ष्मीबाई ब्रीज नावाने ओळखला जाणारा हा पुल मागील चार महिन्यांपासून बंद होता आणि वाहतूक नवीन पुलावरून सुरू होती. काही दिवसापूर्वी जुन्या पुलाचे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर दोन दिवसांपूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, रस्ता सुरू झाल्यावर लगेचच तो खचला आणि मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पुलाच्या कडेला रस्ताचे डांबरीकरण केलेले उखडून देखील गोळा झाली आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्ता पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू झाली होती. नागरिकांचा असा आरोप आहे की, रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने आणि घाईघाईने करण्यात आले, ज्यामुळे हा रस्ता लवकर खराब झाला आहे.
या खड्याचे फोटो प्रसारित झाल्या नंतर तत्काळ pwd विभागाने दखल घेत तो खड्डा बुजविण्याचे काम केले असल्याचे पाहायला मिळाले परंतु करण्यात आलेल्या निकृष्ट दर्ज्याच्या कामावर ठिगळ लावण्याचे काम करण्यात आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि संबंधित विभागावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही