राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
महिला सबलीकरणाचे पहिले पाऊल – पोपटराव सुके ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न 12 hours ago
वारसा समाजकार्याचा, भक्ती बोरगे घडवणार कामथडी गणात विकासाचा नवा प्रवास 2 days ago
पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय युवकाचा हनीट्रॅपद्वारे निर्घृण खून; मृतदेह खेड शिवापूर परिसरात पुरल्याची कबुली 6 days ago
रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या वेळेस वृक्ष तोडत असताना झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी  1 week ago
शिरवळमध्ये अमानवी मारहाणीतून तरुणाचा मृत्यू; दोघे ताब्यात, ‘शिरवळ कडकडीत बंद’ 2 weeks ago
Next
Prev
Home Lifestyle Health

थैमान साथींच्या आजारांचेः निरेत डेंगू, चिकूनगुनियामुळे आरोग्य यंत्रणा ‘व्हेटिंलेटरवर’

सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडल्यास आजारांवर नियंत्रण मिळवणे होईल शक्य

by Team Rajgad Publication
September 9, 2024
थैमान साथींच्या आजारांचेः निरेत डेंगू, चिकूनगुनियामुळे आरोग्य यंत्रणा ‘व्हेटिंलेटरवर’
0
SHARES
149
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निरा/ तुळशीराम जगताप (रियालिटी चेक)

सरकारी दवाखान्यात गर्दी, खाजगी दवाखान्यात गर्दी, दवाखान्याच्या बाहेर गर्दी, प्रत्येक लॅब बाहेर गर्दी, हातात औषधांच्या प्लास्टिकच्या पिशव्या, रुग्णांचे लॅबचे रिपोर्ट आणि रुग्णांचे जेवण घेऊन इकडे तिकडे धावपळ करणारे नातेवाईक असे विदारक चित्र निरा पंचक्रोशीतील डेंगू आणि चिकनगुनिया आजाराचे थैमानाने दिसत आहे. निरा येथील अनेक दवाखान्यांमध्ये जागा शिल्लक नसल्याने अनेक रुग्ण बाहेरगावी किंवा घरीच उपचार घेत असताना दिसत आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

गवते वाढून डासांचे साम्राज्य

निरा पंचक्रोशीमध्ये (निरा- शिवतक्रार, पिंपरे खुर्द, गुळूंचे, कर्नल वाडी, पिसुर्टी, जेऊर आणि मांडकी) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्यापूर्वी आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायती) यांनी समन्वयाने मनापासून वारकरी आणि स्थानिक जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून आपली कर्तव्य तत्परता दाखवली होती. तरीही निरा पंचक्रोशीतील जनतेला पालखी सोहळ्यानंतर व्हायरल इन्फेक्शनने बेजार केले होते. पालखी सोहळ्यानंतर निरा पंचक्रोशीमध्ये पावसाळा सुरू झाला. सगळीकडे पावसाने हैदोस घातला असला तरी, येथे मात्र पाऊस जास्तही नाही आणि कमीही नाही अशी परिस्थितीमध्ये नदीला पूर असला तरी ओढे नाले अजून वाहलेच नाहीत. सतत पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साठून गवते वाढून डासांचे साम्राज्य निर्माण होऊन डेंगू, चिकुन गुनियाला वाव मिळत आहे.

यामुळे येतोय आरोग्य यंत्रणेवर ताण

शासकीय आरोग्य यंत्रणा त्यांचे योगदान पूर्ण क्षमतेने देत आहे. तळा गाळात जाऊन जनजागृती होत आहे. त्यांची क्षमता आहे तेवढ्या जनतेला आरोग्य यंत्रणा उपचाराची सुविधा पुरवत आहे. ग्रामपंचायतीही धुरळणी, फवारणी आणि गटारे सफाई करताना दिसून येत आहे. तरीही डेंगू आणि चिकनगुनिया यंत्रणेला आव्हान देऊन थैमान घालताना दिसून येत आहे. असे का? कारण या यंत्रणांचे कार्यक्षेत्र मोठे, मोठी लोकसंख्या, सुविधांचा अभाव औषधांचा परिपूर्ण पुरवठा नाही आणि परिपूर्ण निधीची तरतूद नसल्याने यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा पडत आहेत.

नागरिकांनी देखील आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे 

डेंगू आणि चिकूनगुनियाच्या थेमानाला या यंत्रणात जबाबदार आहेत असे नाही याला आपणही जबाबदार आहोत. सार्वजनिक कर्तव्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेच आहे, पण आपल्या खाजगी मालमत्तेची साफ सफाई सुद्धा त्यांनीच करायची का? ही आपली जबाबदारी नाही का? अनेकांनी येथे मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत काहींच्या इमारती पडीक मोडकळीस अवस्थेत आहेत व ते दुसरीकडे ऐश्वर्याचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जागेत साठलेली डबकी आणि वाढलेले गवत त्रास व भुर्दंड मात्र स्थानिक जनतेला. जनता मात्र गपगुमान दवाखान्याला पैसे मोजत आहे. अशा बेफिकीर व निष्काळजी लोकांच्यावर आरोग्य खात्यांनी आणि ग्रामपंचायत यांनी साथ रोग अधिनियमानुसार गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.

तालुक्यात मोठ्या शासकीय रुग्णालयाची कमतरता

निरा पंचक्रोशीतील ८० टक्के जनतेकडे पाच लाखापर्यंत आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले योजनेची मोफत उपचाराची कार्ड आहेत. परंतु, संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये कोठेही गंभीर आजारावर मोफत उपचाराची सुविधा नाही. तालुक्यात मोठे सरकारी रुग्णालय अथवा चॅरिटेबल हॉस्पिटल नाहीत. हे पुरंदर तालुक्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना ससून पुणे, सिल्वर जुबली-महिला रुग्णालय-वैद्यकीय महाविद्यालय आणि चॅरिटेबल हॉस्पिटल बारामती, फलटण, लोणंद आणि सातारा या दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या कोणाला बाहेर कुठेही आधार नाही, त्यांना कर्ज काढून का होईना स्थानिक ठिकाणी खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन जगण्याची लढाई लढावी लागत आहे. त्यामुळे निरl पंचक्रोशीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायती यांनी डेंगू व चिकूनगुनियामुळे उद्भभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या असलेल्या सेवेवर मर्यादा पडत असल्याने तातडीने एकत्रित विचारविनिमय करून समन्वय साधून महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेकडे तात्पुरत्या का होईना अतिरिक्त ज्यादा सेवा यंत्रणा आणि औषधांची तसेच आपत्कालीन निधीची मागणी करणे आवश्यक आहे.

Tags: chikangunyadengunirapurandharrajgadnews
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
Gaming

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
Politics

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
Politics

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Politics

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
महिला सबलीकरणाचे पहिले पाऊल – पोपटराव सुके  ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

महिला सबलीकरणाचे पहिले पाऊल – पोपटराव सुके ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

January 12, 2026
वारसा समाजकार्याचा, भक्ती बोरगे घडवणार कामथडी गणात विकासाचा नवा प्रवास

वारसा समाजकार्याचा, भक्ती बोरगे घडवणार कामथडी गणात विकासाचा नवा प्रवास

January 11, 2026
पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय युवकाचा हनीट्रॅपद्वारे निर्घृण खून; मृतदेह खेड शिवापूर परिसरात पुरल्याची कबुली

पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय युवकाचा हनीट्रॅपद्वारे निर्घृण खून; मृतदेह खेड शिवापूर परिसरात पुरल्याची कबुली

January 7, 2026
रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या वेळेस वृक्ष तोडत असताना झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी 

रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या वेळेस वृक्ष तोडत असताना झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी 

January 5, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live