दिपक येडवे|राजगड न्युज
भोर : भोर व वेल्हे तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने भाटघर जलाशयाच्या किनारी असलेल्या गोरड म्हसवलीचे सुपुत्र आणि आंबाडे( ता. भोर )केंद्राचे तज्ञ शिक्षक सुनील गोरड यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
पुनर्रचित अभ्यासकम प्रशिक्षण, शिष्यवृत्ती प्रशिक्षण (इयत्ता पाचवी व आठवी) , निष्ठा प्रशिक्षण, नवभारत साक्षरता प्रशिक्षण एन आय एल पी ,शिक्षण परिषद प्रशिक्षण,निपुण भारत कार्यक्रम प्रशिक्षण, अध्ययन स्तर, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ,भोर तालुका गुणवत्ता कक्ष या उपक्रमात तालुका समन्वयक म्हणून उल्लेखनीय काम, पंचायत समिती भोर शिक्षण विभाग क्रीडा विभाग प्रमुख, इयत्ता तिसरी सर्व विषयाच्याप्रश्न पेढ्या निर्मिती, शालेय उपक्रमात सहभाग शाळा भेटी करणे नमुना पाठ अध्यापन करणे, शिक्षक पाठ निरीक्षण करणे, आदर्श दिग्दर्शन पाठ सादरीकरण करणे, विज्ञान प्रयोगशाळा पडताळणी करणे, तसेच पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन जिल्हा पंच, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच, होमगार्ड प्रशिक्षणामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक, विविध खेळात विभाग स्तरावर सहभागी होवून उल्लेखनीय कार्याबद्दल तालुका पुरस्काराने सुनील गोरड यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष कुंडलिक मेमाणे, भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रमेश बुदगुडे, ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चिकणे,सचिव सुनील गायकवाड, मुख्याध्यापक दीपक शिवतरे, राजेंद्र मोरे, उषा गोरड , रामचंद्र धानवले शिक्षक उपस्थित होते.