कानपूर: येथील राष्ट्रीय महामार्गवर एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक माहिती अशी की, या मृतदेहाची ओळख पटवणे हे कानपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या राष्ट्रीय महामार्गावरुन एक महिला पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास एकटीच जात असल्याचे सीसीटीव्ह फुटेज पोलिसांना मिळाले असून, या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
रस्त्यावरुन जात असलेल्या आणि मयत महिलेच्या अंगावरील कपड्यांचे तुकडे मिळते जुळते असल्याने तीच महिला असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही प्राप्त झाले असून, ही हत्या की अपघात या दृष्टीने पोलिसांना तपास करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापर्यंत महिलेची ओळख पटलेली नाही. परंतु घटनास्थळावरील दृष्य हे भयंकर होते. मयत महिलेचे डोके हे ठेचलेले होते. डोक्यावरचे केस दिसत होते. शरिरावर कपडे नव्हते. तसेच हात पायसुद्धा तुटलेल्या अवस्थेत होते. यामुळे आता मयत महिलेचा बलात्कारानंतर हत्या तर करण्यात आली नसावी, अशी शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर नेमक काय घडले हे समजू शकेल असे कानपूर पोलिसांना सांगितले आहे.