मुंबईः काल दि. ९ डिसेंबरची रात्री ही कुर्लाहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काळरात्र ठरली अन् बसच्या भीषण अपघातात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ४८ प्रवासी जखमी आहेत. यापैकी काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली असून बस चालकाने केवळ १० दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यास बस चालवण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित चालकाला या अगोदर कोणत्याही इलेक्ट्रीक बस चालवण्याचे अनुभन नव्हता, अशी माहिती आता पोलीस तपासांत समोर आली आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या भीषण अपघातमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली असून ३३२ नंबरच्या बेस्टचा बसचा अपघात झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या बसचा चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबरच्या रात्री कुर्लाहून अंधेरीकडे जाणाऱ्या ३३२ नंबरच्या बेस्ट बस समोर येणाऱ्या वाहनांन धडक देत भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू तर ४८ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण ६० प्रवासी प्रवास करीत होते.
जमावाकडून चालकास मारहाण
या अपघाताच्या घटनेनंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. चालकाला जमावाकडून मारहाण करण्यात आली परंतु पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्याने मोठे होणारी घटना टळली असल्याचे पोलिसांनी सांगितले.