शिरवळ : शिरवळ ता.खंडाळा येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये विकास कामाच्या श्रेय वादावरून नेहमीच वादंग पाहायला मिळत असतो त्यामध्येच शिरवळ येथील सटवाई कॉलनी येथील साकव पुलाच्या कामाच्या मंजुरीवरून शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने व राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यामध्ये चांगलेच वाद निर्माण झाले असून यामध्ये शिवसेनेचे फ्लेक्स फाडले कारणावरून चांगलीच ठिणगी पडली आहे. यामध्ये माने यांनी शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.
शिरवळ ता.खंडाळा येथील सटवाई कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव काही वर्षा पूर्वी ढगफुटीने वाहून गेला. या संदर्भात उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे ६० लाख रुपये मंजूर केले. ही मंजुरी २२ डिसेंबर रोजी दिली गेली ही मंजुरी आली मात्र तेव्हापासूनच या साकव पुलाच्या कामाच्या मंजुरुवरून शिवसेना राष्ट्रवादीत श्रेयवाद सुरू झाला.या साकव पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून आमदार मकरंद पाटील यांचे कार्यकर्ते व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांच्यात वाद सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना यांनी रविवारी शिरवळ मध्ये फ्लेक्स लावत आपणच मंजुरी आणल्याच्या फ्लेक्स वार सुरू झाले. परंतु हा वार टोकाला जात रविवारी रात्रीच अज्ञाताने शिवसेनेने लावलेला सटवाई कॉलनी येथील फ्लेक्स फाडून टाकला.याच कारणावरून आता राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्ते यांच्यात मोठा वादंग तयार झाला आहे.शिवसेनेचे माने यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात अज्ञातावर कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन देखील दिले आहे.
आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेतले जात असून आम्ही लावलेले फ्लेक्स देखील फाडण्यात आल्याचा निंदनीय प्रकार केला असून यावर आम्ही शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रदीप माने उपजिल्हाप्रमुख शिवसेना,सातारा