शिरुर: रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बक्षीस वितरणात प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी महेश डोके हे उपस्थित होते. शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमधील संपदा पतसंस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी घरगुती गौरी आणि गणपती स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वच महिला भगिनींचे अभिनंदन केले. तसेच शिरुर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचेही कौतुक केले. आपल्याकडे गौरी, गणपती, नवरात्री हे उत्सव अशा विविध प्रकारचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात पुर्वी अनेकवेळा प्लास्टिक, थर्माकॉल आणि इतर वस्तू आपण सजावटीला वापरायचो. परंतु, सध्या पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. आता आपण शाडूच्या मातीपासून गणपती किंवा पर्यावरणपूरक विघटित होणारा कचरा या पासून सजावट करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत असल्याचे प्रतिपादन शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केले.
कलागुणांना वाव मिळण्यासाठीचा अनोखा उपक्रम
गौरी व गणपतीत प्रदुषण विरहित सजावट, स्वतःच्या हाताने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सजावट व्हावी, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे. यासाठी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
शिरुर शहर तालुक्यातील ग्रामीण भागातून घरगुती गौरी सजावट स्पर्धेत १५० तर घरगुती गणपती सजावट स्पर्धेत १०० असे एकुण २५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या पर्यवेक्षक म्हणून शर्मिला नीचित यांनी काम पाहिले. गौरी व गणपती स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
घरगुती गौरी सजावट स्पर्धेतील विजेते
१) वैशाली हारके
२) प्रियंका कोठारी
३) शोभा मचाले
४) मनीषा कालेवर
५) गौरी घावटे
घरगुती गणपती सजावट विजेते
१) मेघा गायकवाड
२) इंद्रजित थोरात
३) सौदामिनी शेटे
४) प्रतीक्षा भावटणकर
५)अद्वैत पाटील
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशध्यक्षा शोभना पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश देशमुख, नानासाहेब काळे, पत्रकार अरुणकुमार मोटे, सागर नरवडे, कलीम सय्यद, वृषभ मुथा, अक्षय सोनवणे, पत्रकार संजीवनी कदम, रेश्मा शेख, राणी शिंदे, डॉ वैशाली साखरे, कल्पना चांदगुडे, दुर्गा ननवरे, शितल शर्मा, भाग्यश्री लिंगे, ललिता पोळ, मनीषा टेंभेकर, अनुपमा दोषी, सुवर्णा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेजस फडके यांनी तर प्रास्ताविक व आभार राणी कर्डिले यांनी मानले.