राज्यात अजूनही आघाडीच्या वतीने जागावाटपातील तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईमध्ये आघाडीतील मुख्य घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत २८८ पैकी २१६ जागांवर शिक्का मोर्तेब झाला असल्याची माहिती मिळत आहे. अजून ७२ जागांवर घोडं अडून असल्याची सांगितले जात आहे. यातच शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या बाबत केलेल्या विधानामुळे आघाडीच्या गोठात चर्चा झडू लागल्या आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी जयंत पाटील यांच्याकडे असल्याचे पवार म्हणाले आहेत. यामुळे आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जयंत पाटील आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी असून, ज्या पद्धतीने ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. असे पवार म्हणाले आहेत. यावर खुद्द पाटील यांनी आमची महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा केली जाते, त्यावर जाहीररित्या चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितले आहे.
तर उबाठाचे संजय राऊत यांची देखील यावर प्रतिक्रिया समोर आली आहे. तसे काही पवार साहेबांचे संकेत असतील, तर आम्ही चर्चा करू पवार साहेब कधीही असले कुठले संदेश देत नाहीत. मध्यतंरी त्यांनी रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदार देणार असल्याची घोषणा केली होती. पण एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हांडचे नाव घेतले जाते. मग प्रश्न असा तयार होतो की एकाच पक्षात कस काय ५ ते ६ मुख्यमंत्री होऊ शकतात. अशी प्रतिक्रिया उबाठाचे संजय राऊत यांनी दिली आहे,