मुंबईः विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दि. ९ डिसेंबर रोजी शेवटचा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोध बाकांवरील आमदारांनी आपले बोलणे सभागृहात मांडले. सभागृहात सर्वांत लक्षवेधी भाषण ठरले ते सर्वांत तरुण आमदार रोहित पाटील यांचे. रोहित यांनी वयाच्या २५ व्या वर्षी विधासभेत सर्वांत तरुण वयात जाण्याचा मान मिळाला आहे. त्यांना दिलेल्या वेळेत अगदी मुद्देसुद मांडणी करीत विविध मुद्दे सर्वांसमोर मांडत विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार त्यांचे बोलणे शांत चित्ताने ऐकत होते. यावेळी रोहित यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विविध मागण्या करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोध बाकावरच्या आमदारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली.
सभागृहाचे सर्वांत तरुण अध्यक्षपद आपण भूषविलेले आहे. सभागृहातील कामकाजांकडे आपण बारकाईने लक्ष द्यावे. तुम्ही वकील आहात मी सुद्धा वकिली करतोय. जसं तुमचं वकिलांकडे लक्ष आहे. तसं याही वकिलाकडे लक्ष द्यावे, अशी विनंती यावेळी रोहित यांनी केली. तसचे विरोधी पक्षांकडे आपले लक्ष असेल. विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या मागण्या मान्य कराल आणि आमच्या मागण्या लक्षात घेत त्यास न्याय द्याल, अशी मागणी यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विविध समित्यांवर लक्ष ठेवावे. सभागृहाच्या माध्यमातून चांगले कायदे तयार व्हावेत. असे देखील रोहित यावेळी म्हणाले.