भोर – शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे पसुरेतील मानसिंगबाबा धुमाळ यांची येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर – वेल्हा तालुक्याच्या प्रचारप्रमुख पदी निवड करण्यात आली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड केली.
मानसिंगबाबा धुमाळ हे नेहमीच आपल्या पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवत आले आहेत.कट्टरता आणि पक्षाशी एकनिष्ठता ही त्यांनी नेहमी जपली आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात व गावा गावात सर्व सामान्यांच्या सुख दुःखात, विविध विकास कामांत मानसिंगबाबा नेहमी अग्रेसर असतात.त्यांचा तालुक्यातील असणारा मोठा जनसंपर्क लक्षात घेता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. मानसिंगबाबा धुमाळ यांची प्रचार प्रमुख पदी निवड झाल्याने तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.
भविष्यात नव्या जोमात,नव्या पक्ष चिन्हाचा व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार व प्रचार येणा-या आगामी निवडणुकीत सर्व घटकांना बरोबर सर्व गावा गावात करणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.