भोर प्रतिनिधी –कुंदन झांजले
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले निवडीचे पत्र
मराठा आरक्षणासाठी भोलावडे राष्ट्रवादी गणाच्या महिला अध्यक्ष पदाच्या राजीनामा देणा-या भोलावडेतील महिला मिनाक्षी गणेश गावडे यांची पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष पदी निवड संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्र देत केली.
याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे ,महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, भोर तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल , तालुका कार्याध्यक्ष संदीप नांगरे , महिला तालुकाध्यक्षा विद्या यादव, युवक तालुकाध्यक्ष गणेश खुटवड, भोलावडे गावचे विद्यमान सरपंच प्रविण जगदाळे ,उपसरपंच अविनाश आवाळे, माजी उपसरपंच गणेश आवाळे , माजी सरपंच शशिकांत जगदाळे, भरत आवाळे , तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, मोहन आवाळे, दत्ता अब्दागिरे, बंडा तारू, प्रशांत पडवळ, निलेश गावडे, सागर खुठवड, माऊली आवाळे ,गणेश गावडे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.