सातारा: सातारा शहरातील करंजेपेठेत २२ ते २३ मार्च २०२४ दरम्यान घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत 12 तासांत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीला गेलेला 1.5 लाखांचा तांबा देखील हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ भांडी दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 1.5 लाखांचा तांबा चोरून नेला होता. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या चौकशीद्वारे आरोपींचा शोध घेतला.
23 मार्च रोजी, तपास पथकाला माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अभिषेक उर्फ सोमनाथ आवारे, ओंकार संदिप थोरात आणि रोहन विलास थोरात यांनी हा गुन्हा केला आहे.त्यानंतर पथकाने त्वरित कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. चोरीला गेलेला तांबा देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांधळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अमित माने, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, अजय जाधव, अमित झेंडे, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, सचिन ससाणे, मयुर देशमुख आणि शिवाजी गुरव यांचा समावेश होता.
पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.