सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव
पुरंदर येथे संत सेना महाराज सेवाभावी मंडळाच्या वतीने संत सेना महाराज 654 व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत सोपान काका महाराज मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. सकाळीच्या वेळी भजन, सेना महाराज महापूजा आणि संत सेना महाराज प्रतिमेला पूजन करण्यात आले. उपस्थित भाविकांना स्वप्निल महाराज काळाने यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले, तर दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमासाठी आमदार संजय जगताप, माजी नगरसेवक मुन्ना शिंदे, वामन (तात्या) जगताप, वैभव (बापू) जगताप, अजित जगताप, पुणे जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष भारत मोरे, सासवड शहर अध्यक्ष अमोल राऊत, उपाध्यक्ष संतोष इभाड, बंटी शिंदे, नवनाथ मोरे, सोमनाथ शिंदे, संतोष पांडे, अमोल गवळी, जगन्नाथ मोरे, रामदास क्षीरसागर, पांडुरंग मोरे, पोपट राऊत, जनार्दन गवळी, अमित शिंदे, दत्ता मोरे, सासवडमधील महिला मंडळ, नागरिक, पत्रकार, पुरंदर तालुका यातील नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, युवक, युवती, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, सदस्य आदी उपस्थित होते.