सासवड प्रतिनिधी: खंडू जाधव
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शहरात मलेरिया, डेंग्यु व चिकुनगुण्या (dengue, maleriya, chikanguniya) या सारखे आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांनी आपले घरपरिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन सासवड नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे. यामधेय प्रामुख्याने हे आजार होऊ नयेत यासाठी सासवड नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सांगण्यात आले आहे. डेंग्यु या डासांची वाढ व उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे पाणी जास्त दिवस साठवून ठेऊ नये. तसेच हे पाणी साठवूण संपूर्णपणे झाकूण ठेवावे, घरामध्ये असणाऱ्या फ्रिज, एअरकुलर, फ्लावर पॉट, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, पत्र्यांचे डबे अथवा इतर वस्तू यामध्ये पाणी ५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहणार नाही, याची देखीव काळजी नागिरकांनी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. कारण या पाण्यामध्ये डेंग्युच्या व चिकणगुण्याच्या डासांची पैदास होवू शकते.
घराबाहेरील परिसरात असणाऱ्या रिकामी शहाळे, फुटक्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे, रिकामे टायर्स, खड्डे इत्यादींमध्ये पावसाचे पाणी जास्त दिवस साठून त्यामध्ये डेंग्युंच्या डासांची पैदास होवू शकते, यासाठी या वस्तुंची विल्हेवाट लावणे व आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- गच्छीवर असणाऱ्या अथवा जमिनीवर असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची झाकणे गच्च लावणे.
- पाणी साठविण्याचे ड्रम, बॅरल इत्यादी दर २-३ दिवसांनी धुवून स्वच्छ कोरडे करावेत.
- सेप्टी टँकच्या व्हेंट पाईपला वरच्या पाईपला नॉयलॉन जाळी बसवून घेणे.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, असे आवाहन सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे. तरी सासवड शहरातील सर्व नागरीकांनी याचे काटेकोरपणे पालन करावे व खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.