जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा देवाचे दर्शन करून नारळ फोडत उमेदवारीचा श्रीगणेशा करण्यात आला. दिवे ते सासवड अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये तरुणांसह महिलांचा उस्फुर्त सहभाग होता. संभाजीराव झेंडेचे फलक हातात धरुन विकासाचे नाव संभाजीराव अशा घोषणा देण्यात आल्या. तळपते ऊन असूनही तरुण, महिला आणि नागरिकांचा सहभाग मोठा होता. सासवड येथील शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दादा जाधवराव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात होते. या सभेला देखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी गणेश कटके, संदिप जगताप, विजय दगडे, युवराज जगताप, चेतन मेमाणे, शेखर दिघे, योगेशनाना फडतरे, साधू दिघे, बबन, शामकांत भिंताडे, अमोल कामथे, बाळासाहेब भिंताडे, ओंकार घुले, शिवाजी काळभोर, मा. संरपंच दत्तात्रय भोंगळे, शेतकरी कामगार पक्षाचे सचिव अॅड. राजेंद्र कोरडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी मी थांबलो….. पण आता नाही !
२०१९ ला विद्यमान आमदार आणि मला पवार साहेबांनी गोविंद बाग येथे बोलावले होते. त्यावेळी साहेबांनी सांगितलं तुम्ही दोघे उभे राहिलात तर दोघांनाही मतविभाजनाचा मोठा फटका बसेल. त्यामुळे एकजण कोणी तरी थांबा, पुढच्या वेळी त्यांना संधी देण्यात येईल. त्यामुळे मी थांबलो असल्याचे झेंंडे यांनी सांगितले. त्यामुळे आताची निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतलेली आहे. दोन्ही उमेवारांचा इतिहास पहा असे देखील ते यावेळी म्हणाले. ही निवडणूक पुरंदरच्या स्वाभिमानी जनेतेसाठी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
माझं तिकीट फायनल झालं होतं पण…..
शरद पवारांनी तिकीट देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मोरगाव अर्जुनी मतदार संघ तुम्हाला देतो. आणि त्या बदल्यात पुरंदर आम्हाला द्या, असे सांगण्यात आले होते. मात्र, सांगलीच्या काही लोकांनी मधस्थी करुन नावामध्ये बदल करुन घेतला असल्याचे ते यावेळी म्हणालेेेे. यामुळे आता पुरंदरची स्वाभिमानी जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतून देखील दबाव आणून नाव बदलले असल्याचे स्पष्टीकरण झेंडे यांनी यावेळी दिले. हे घरोघरी जावून सांगा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.