भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भोर तालुक्यात देशाचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८३व्या जन्मदिवसानिमित्त शरद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भोर येथील उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.तसेच भोर शहरातील आधारवड या वद्धाश्रमातही फळे व आवश्यक साहीत्याचे वाटप करून त्यांची विचारपूस करण्यात आली. तालुक्यातील सर्व पदाधिका-यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब नाबाद ८३ अशा शब्दांत प्रेमरुपी दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल, शहराध्यक्ष यशवंत डाळ, कार्याध्यक्ष संदिप नांगरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, पंचायत समिती माजी उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ, माजी जि.प. सदस्या वंदनाताई धुमाळ, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, ज्येष्ठ नागरीक सेलचे तालुकाध्यक्ष भिकोबा कुमकर, पदवीधर सेलचे अध्यक्ष पार्थ रावळ, तालुका उपाध्यक्ष सर्जेराव पडवळ, विधी सेलचे प्रदेश सरचिटणीस गणेश डिंबळे, युवक उपाध्यक्ष गणेश गोसावी, माजी सरपंच रोहिदास जेधे, माजी सरपंच धोंडीबा खुटवड, सारंग शेटे, अजित बांदल, गणेश गावडे, गणेशनाना खुटवड, विकास कुमकर तसेच भोर तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.