कुंदन झांजले! राजगड न्युज
अनिलनाना सावले युवा मंच, वीसगाव- चाळीसगाव खोरेतील तरुणांनी केले आयोजन
भोर: आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली अनिल नाना सावले युवा मंच ,वीसगाव- चाळीसगाव खोरे,नेरे-पुणे- मुंबई येथील तरुणांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त “रोहिडा केसरी” भव्य बैलगाडा शर्यत शहरातील वाघजाई देवी मंदिरापाठीमागील मैदानावर मंगळवारी (दि.२०) आयोजित केली असल्याची माहिती युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांनी दिली.
या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी अनिल सावले यांस कडून दुचाकी (टू व्हीलर), द्वितीय क्रमांकासाठी भोरचे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्याकडून ४१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी नेरे गावचे सरपंच विजय बढे यांस कडून ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी उद्योजक नवनाथ मानकर यांच्यातर्फे २१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी घोलप यांस कडून १५ हजार रुपये, सहाव्या क्रमांकासाठी युवा उद्योजक कुणाल बुदगुडे यांच्याकडून ११ हजार रुपये , सातव्या क्रमांकासाठी धोंडीबा पाटणे यांच कडून ७ हजार ,तर आठव्या क्रमांकासाठी संजय मळेकर यांजकडून ५ हजार रुपये रोख अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रकाश खोपडे यांच्यातर्फे सर्व क्रमांकासाठी ढाल देण्यात येणार आहे. समालोचनासाठी मयूर तळेकर, प्रवीण घाटे व झेंडा पंच म्हणून कालिदास घाटे काम पाहणार आहेत तर या स्पर्धेचे आयोजन अक्षय पवार ,संतोष शिवतरे ,राहुल पाटणे, शिवाजी बढे, मयूर थोपटे, योगेश घोलप, निलेश दळवी, सागर दरेकर अशा तरुणांसह अनिलनाना युवा मंच यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी शर्यतीच्या सर्व अटी व नियम लागू असणार आहेत . मंगळवारी सकाळी ९ वाजता ही बैलगाडा शर्यत सुरू होणार आहे.तालुक्यातील मोठ्या संख्येने बैलगाडा स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.युट्युबवर याचे प्रक्षेपण प्रसारित करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.