रांजणगावः पुणे-नगर महामार्गवर एसटी प्रवास करणाऱ्या अंध व्यक्तीला थांबा आल्यानंतर एसटी बसमधून उशिरा होत असल्याच्या कारणावरून संबंधित एसटीचे चालक आणि वाहकाने अंध व्यक्तीस त्यांच्या अंधत्वाबद्दल बोलून शिवागाळी केली. तसेच हे एवढ्यावच थांबले नाहीत तर त्या दोघांनी अंध व्यक्तीस मारहाण देखील केली असल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंध व्यक्तीने रांजणगाव एमआडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्याद दाखल केलेल्या अंध व्यक्तीचे नाव कौशल घोडके (वय २३ रा. भांबुर्ड रोड, रांजणगाव गणपती) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौशल घोडके हे पुणे-नगर महामार्गवरून एम एच २० बी एल ३४२० या एसटी बसने प्रवास करताना त्यांना ज्या ठिकाणी उतरायचे आहे, तो थांबा आला. त्यावेळी त्यांना एसटी थांब्यावर लवकर उतरता येत नसल्याने एसटीचे चालक व वाहक(नाव माहित नाही) या दोघांनी त्यांना त्यांच्या अंधत्वाबद्दल बोलून तसेच शिवगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण केली. त्यानुसार रांजगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.