राजगडः येथे कॅबिनेट मंत्री दर्जा व जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या आदेशावरून किरण दगडे पाटील भोर विधानसभा निवडणूक प्रमुख, सरचिटणीस शेखर ओढणे, सचिव सुषमा जागडे यांच्या सहमतीने राजु रेणुसे अध्यक्ष भाजपा राजगड तालुका यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राजगड तालुका कार्यकरणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये सरचिटणीस विठ्ठल गोरे, रामभाऊ लिम्हाण, रोहिदास शिंदे, शांताराम मोहिते, सुलोचना तांदळे, उपाध्यक्ष राजु खुळे, रोहिदास करंजकर, सुनिल बोरगे, सूर्यकांत राऊत, मंगेश कुंभार, गणेश घोरे, विजय रेणुसे, सोमनाथ शेंडकर, सचिव श्रीकांत पवार, रवींद्र चोरघे, लहू पोळेकर, राजेंद्र डेबे, दीपक कडू, भाजपा युवा मोर्चा राजगड अध्यक्ष अविनाश भोसले, महिला मोर्चा अध्यक्ष गौरी भरम, किसान मोर्चा अध्यक्ष प्रशांत शिळीमकर, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष राहुल रणखांबे, युवा वरियर्स अध्यक्ष सुहास शेंडकर, सोशल मीडिया अध्यक्ष प्रणव वालगुडे यांची निुयक्ती करण्यात आली.
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व अध्यक्ष कृषी शिक्षण व संशोधन महामंडळ महाराष्ट्र राज्य वासुदेव काळे, तात्यासाहेब गावडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा, आकाश कांबळे सरचिटणीस, पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहल दगडे, जिल्हा सचिव सचिन मांडके, देवा हनमघर, पंकज खुर्द, नानासाहेब शेंडे, महिला सरचिटणीस जानवी बोरसे तसेच वेल्हे तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कैलास बिरामने, प्रमोद काका पासलकर, अण्णासाहेब शेंडकर, शिवाजी आप्पा सोनवणे, भाऊसाहेब मरगळे, प्रकाश बोडके, उत्तम दादा रेणुसे, अनंता आधवडे, विशाल शिळीमकर, एकनाथ पोळेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.