दौंड: (संदीप पानसरे)
दौंड तालुक्याच्या मंत्रीपदाची आशा कधी संपणार याकडे दौंडचे मतदार आतुरतेने वाट पाहत बसलेले आहेत. दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कुल यांना निवडून द्या, आम्ही त्यांना लाल दिवा देतो, असे आश्वासन येथील मतदारांना २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत देण्यात आले. मात्र, अद्यापर्यंत कुल यांची मंत्री पदासाठी वर्णी लागलेली नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत कुल हे तिसऱ्यांदा दौंड विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेले आहे. इथल्या मतदारांना कुल यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. मात्र, २०१४ पासून मंत्रीपद राहुल कुल म्हणजेच दौंडच्या वाट्याला येईल, असे सांगण्यात आले. मात्र, तसे झालेले नाही. यामुळे आता नेत्यांनी दाखवलेल्या आश्वासना बुलथापा होत्या का, असा प्रश्ना आता येथील मतदारांना पडला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड वगळता प्रत्येक तालुक्याला मंत्री पद मिळालेले आहे. जुन्या व नवीन लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, बारामती, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, दौंड हे तालुके येत येथून शरद पवार, रामकृष्ण मोरे, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब थिटे, अनंतराव थोपटे, दादा जाधवराव, विजय शिवतारे यांना मंत्रिपदे मिळालेली आहेत. 1978 चा अपवाद वगळता 2014 पर्यंत दौंड तालुका कायम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे उभा राहिलेला आहे. पुणे जिल्ह्याचा विचार करता दौंड, जुन्नर, खेड या तालुक्यांना अद्याप मंत्री पद मिळालेले नाही, यामुळे आता तरी दौंड तालुक्याला मंत्रीमंडळात स्थान मिळेल का, असा प्रश्न येथील मतदार विचारत आहेत.
मंत्री पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता
राज्यात महायुतीची सत्ता येणार असून, सत्तास्थापनेसाठीच्या वेगवान हालचाली होताना दिसत आहे. मात्र, अद्यापर्यंत मुख्यमंत्री कोण होणार यावरची अंतिम शिक्का मोर्तेब झालेला नाही. अशातच अनेकांना आता मंत्रीपदाचे वेद लागल्याचे पाहिला मिळत आहेत. यामुळे सत्ता स्थापनेनंतर मंत्रीपदा वाटपात देखील खंडाजंगी होणार असल्याची पाहिला मिळू शकते.