जेजुरीः निरा येथील निरा नदी व दत्तघाटाच्या परिसराची ‘वल्ड क्लिनिक डे’चे औचित्य साधत साफसफाई करण्यात आली. Champion X Dai Ichi Pvt Ltd कंपनीच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यामध्ये कंपनीतील ३० ते ४० कर्मचारी सहभागी झाले होते. गणपती विसर्जन झाल्यानंर येथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. चॅम्पियन या कंपनीने पुढाकार घेत तसेच सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
गणपती विसर्जनानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे येथील कचऱ्याचे संकलन कर्मचाऱ्यांनी केले. त्यानंर संकलिकत झालेला कचरा निरा ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीत टाकण्यात आला. त्यांनंतर जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या उपक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत या ठिकाणच्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या उपक्रमात निरा येथील ज्युबलियट कंपनीचे देखील काही कर्मचारी सहभागी झाले होते. सातारा हायवे पूल व छोटा पूलच्या इथे पाण्यामुळे ग्रीलला अडकेला कचरा देखील संकलित करण्यात आला. स्वच्छता करण्यासाठी कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते.