Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरचे राजकारणः विद्यमान आमदारांना पुन्हा संधी की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या नावाचा विचार होणार? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

यंदाची निवडणूक मोठी चुरस आणणारी ठरणार? आघाडी आणि युतीमध्ये अनेक इच्छुक, वाटाघाटी कराव्या लागणारः सूत्रांची माहिती

by Team Rajgad Publication
October 16, 2024
पुरंदरचे राजकारणः विद्यमान आमदारांना पुन्हा संधी की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या नावाचा विचार होणार? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

पुरंदर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने झेंडे स्वःताच प्रचार यंत्रणा राबविताना दिसत आहेत. तसेच मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०१९ मध्ये झेंडे हे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. मात्र, शरद पवारांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी पुढच्या वेळी निवडणूक लढणार असल्याचे झेंडेनी संकेत दिले होते. सध्याच्या घडीला या मतदार संघात संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. यामुळे झेंडे बंडाचे निशान फडकविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

संभाजीराव झेंडेबाबत काय निर्णय होणार? 

 

कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे कालपासूनच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाविकास आघाडी वा महायुतीकडून जागावाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आघाडी आणि युतीमध्ये जागावाटपात पेच निर्माण झाला असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत.  यातच अनेकजण पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी मिळणार या आशेने अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामुळे या पक्षात इन्कमिंग वाढले असल्याचे पाहिला मिळत आहे. अशा राजकीय वातावरणात संभाजीराव झेंडेबाबत काय निर्णय होतो त्यावर झेंडे कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

इच्छुक अनेक संधी कोणाला?

 

२००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक टेकवडे हे या मतदार संघातून आमदार झाले होते. त्यानंतरच्या काळात दोन टर्म या मतदारसघांचे प्रतिनिधीत्व शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी केले होते. त्यानंतरच्या काळात म्हणजेच २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने लढवून येथून संजय जगताप हे आमदार झाले. सध्याच्या घडीला पुरंदरमधून आघाडी आणि युती दोन्हींकडून इच्छूक उमेदवार अनेक आहेत. यामुळे कोणाला संधी मिळते हे पाहवे लागणार आहे.

अभी नही तो कभी नहीः संभाजी झेंडे यांचा नारा 

 

लोकसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप यांची खासदार सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यात मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे झेंडे यांनी पक्ष सावरण्याचे तसेच कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षनेत्वृत दखल घेऊन आपल्याला उमेदवारी देईल अशी आशा झेंडे यांना आहे. यामुळे त्यांनी अभी नही तो कभी नही असा नारा दिला आहे. यावर ते निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यावर पक्षनेत्वृत्व काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

युती आणि आघाडीकडून इच्छुकांकडून तयारीला सुरूवात 

 

महायुतीकडून मा. राज्यमंत्री विजय शिवतारे तयारीला लागले आहेत. भाजपकडून गंगाराम जगदाळे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ते देखील कार्यकर्ते मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन करीत आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले अशोक टेकवडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे यांचे समर्थक तालुक्यात बॅनरबाजी करून त्यांच्या उमेदवारीचे संकेत देत आहेत. यामुळे महायुतीमध्ये अनेकजण इच्छुक असल्याचे पाहिला मिळत आहेत. यावर पक्षश्रेष्ठ काय निर्णय घेणार यावर महायुतीकडून कोण निवडणूक लढणार हे ठरणार आहे.

यंदाची निवडणूक चुरशीची होणार…!

 

विद्यामान आमदार तालुक्यातील गावात भेटी देत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना दिसत आहे. शिवतारे देखील गावभेट दौऱ्यात व्यस्त आहेत. विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. संभाजी झेंडे यांनी स्वःताह प्रचार यंत्रणा राबवली असून, गावोगावी जात अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच तालुक्यात अनेक कार्यक्रम ते घेत आहेत. यामुळे पुरंदर विधान सभेची निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे जाणकार सांगतात.

Tags: maharashtravidhansabhaelection2024purandharvidhansabharajgadnewssambhajiraozendesanjayjagtap
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

शिंदेंचा 'तो' मोठा पॅाझ अन् दादा खुदूखुदू हसू लागले; महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिंदेच्या तोंडून आलेल्या वाक्यांवर सारेजण खळखळून हसले

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us