पुणेः पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असून, यामध्ये पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, समाधान नाईकनवरे आणि सुजाता डेरे कदम ही आहेत. या सर्वं पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार पदी बढती मिळाली आहे. यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांचा बढती मिळाल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अविनाश शिळीमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.