राजगड वृत्तसेवा पुणे
कॉलेजमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, त्यानंतर मित्राने त्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच संबंध ठेवताना काढलेले ..
पुणे: कॉलेजमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, त्यानंतर मित्राने त्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच संबंध ठेवताना काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या नराधमावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव बन्सी शरमाळे (२४, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
हा प्रकार मागील दीड वर्षापासून वारंवार आंबेगाव येथील एका कॅम्पसमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एका कॉलेजमध्ये शिकत असून ते एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने प्रोजेक्ट बनवायचा असल्याचे सांगून तरुणीला फ्लॅटवर बोलवून घेतले.
तिच्याकडे लग्नाची मागणी करून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवताना आरोपीने फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने वारंवार तरुणीवर अत्याचार केले. तसेच घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.